दिवाळी निमीत्त संयुक्तराष्ट्रांचे विशेष टपाल तिकीट

0
313

संयुक्तराष्ट्र संघाच्या पोस्ट विभागातर्फे पुढील महिन्यात दिवाळीनिमीत्त एक विशेष टपाल तिकीट प्रसारीत केले जाणार आहे. 19 ऑक्‍टोबरला तिकीटाचे प्रकाशन होईल अशी माहिती संयुक्तराष्ट्रांच्या सूत्रांनी दिली. न्युयॉर्कला त्याच्या प्रकाशनाच्या निमीत्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिवाळीच्या दिव्यांचे महत्व या तिकीटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आलेल्या घोषणेचे भारताचे तेथील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी स्वागत केले आहे.

या आधी युनायटेड स्टेट्‌स पोस्टल सर्व्हीसेसने ऑक्‍टोबर 2016 मध्ये असे दिवाळी टपाल तिकीट काढले होते. अमेरिकेतील भारतीय नागरीकांना सात वर्षे सतत प्रयत्न करून संयुक्तराष्ट्रांना हे विशेष टपाल तिकीट प्रदर्शित करण्यास प्रवृत्त केले आहे.