दक्षिण आफ्रिकेचे आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान

0
17

भारताला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध दुस-या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवलेल्या विजयामुळे भारताचे पहिले स्थान खाली घसरले आहे.

ऑस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत ४-१ ने हरवल्यानंतर भारताचा संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही बांगलादेशचा धुव्वा उडवला. ३ सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेचा संघ २-० ने पुढे आहे. याच कामगिरीचा फायदा घेत आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ६२४४ गुण असून भारत ५९९३ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. दरम्यान भारतालाही आपले रँकिंग सुधारण्याची संधी आलेली आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतीय  j9संघाने न्यूझीलंडवरही मात केल्यास भारतीय संघ पून्हा आपले पहिले स्थान परत मिळवू शकतो.

आयसीसी 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचेण, आयोजन करते. कसोटी व एकदिवसीय सामने  खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.