”तेज’वरून 24 तासात 1.8 कोटी व्यवहार

0
36

गुगलने तेज हे डिजीटल व्यवहारसाठीचे ऍप सुरू केल्यानंतर 24 तासाच्या आत भारतातील 4 लाख 10 हजार नागरीकानी हे ऍप डाऊन लोड केले आहे. त्याचबरोबर 1.8 कोटी वस्तूची खरेदी केली असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.

# सोमवारी सायंकाळी गुगलने तेज हे डिजीटल व्यवहारसाठीचे ऍप सुरू केल्यानंतर 24 तासाच्या आत भारतातील 4 लाख 10 हजार नागरीकानी हे ऍप डाऊन लोड केले आहे. त्याचबरोबर 1.8 कोटी वस्तूची खरेदी केली असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.

# नोटाबंदी झाल्यानंतर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंसर पिचाई यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी असे ऍप विकसित करण्याबाबत बोलणी झाली होती. त्यानंतर गुगलने खास भारतासाठी हे ऍप तयार केले असून ते केवळ भारतात सुरू केले आहे. या ऍपचा वापर कसा होतो हे पाहून नंतर हे ऍप इतर देशात चालू करण्याच्या शक्‍यतेवर विचार केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.भारत सरकारने युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुरू केले आहे. यावर हे ऍप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तात्काळ छोटी आणि मोठी पेमेंट करता येतात. हे ऍप मराठीसह सात भाषात उपलब्ध करण्यात आले आहे. देशातील चार मोठ्या बॅंकानी यासाठी सहकार्य केले आहे. याचबरोबर यामुळे कर दात्याची संख्या आणि कर संकलन वाढणार आहे. तेज ऍपद्वारे पैसे पाठवणे, बॅंक खात्यात थेट पैसे स्वीकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच, हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाला ते थेट बॅंक खात्याशी जोडता येईल. तेज ऍपद्वारे पैशांचे ट्रान्सफर सोपे आणि सुरक्षित असेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

# 2020 पर्यंत भारतीय डिजिटल पेमेन्ट बाजारपेठ 500 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. या ऍपमध्ये मल्टी लेअर सुविधेचा समावेश असेल. पेटीएम आणि मोबीक्विक यांना साहाय्य करण्याची या ऍपची क्षमता आहे. डेस्कटॉपसाठी क्रोम विजेट आणि गुगलच्या प्ले स्टोअरवर ऍप उपलब्ध करण्यात येईल. गुगलकडून नव्याने अपडेट करण्यात येणाऱ्या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये हे ऍप समाविष्ट करण्यात येईल. या ऍपमध्ये ई व्यापार, मोबिलिटी, प्ले म्युझिक, प्ले स्टोअर यासाठी देयक देण्याची सोय असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुगलला मोबाईल पेमेन्ट सुविधेमध्ये मर्यादित यश आले आहे.

# गुगल वॉलेटच्या अपयशानंतर कंपनीकडून ऍन्ड्रॉईड पे दोन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आले होते. भारतीय बाजारात अगोदरच अनेक कंपन्यांचे वर्चस्व असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लक्ष आहे. ट्रूकॉलर, उबेर, ऍमेझॉन आणि व्हॉट्‌सऍप भारतात सेवा देण्यास उडी मारण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत ऍन्ड्रॉईडचा 97 टक्के हिस्सा असून त्या माध्यमातून डिजिटल पेमेन्टमध्ये उतरण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.