‘तितली’मुळे ओदिशा, आंध्र प्रदेशमध्ये हायअलर्ट

0
354

बंगालच्या उपसागरातील ‘तितली’ चक्रीवादळ तीव्र होत असून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओदिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे ओदिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तितली चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून ते ओदिशा आणि आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. गुरुवारी सकाळी गोपालपूर आणि कलिंगपट्टणम दरम्यान हे वादळ धडकण्याची शक्यता असून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओदिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवारी) अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर ओदिशा सरकारने राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. आपातकालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.