तामिळ अभिनेत्री त्रिशा युनिसेफची दूत म्हणून नियुक्त

0
23

तामिळ अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिला युनिसेफ कडून सेलिब्रिटी ऍडव्होकेटचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्रिशाला युनिसेफची दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

लहान मुलांच्या अधिकाऱ्याबाबत ती तरुण पिढीत जागरूकता निर्माण करेल. असे युनिसेफने म्हटले आहे. युनिसेफ कडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ही मागणी देण्यात आली आहे. रक्तक्षय, बालविवाह, आणि लहान मुलांचे शोषण आदी प्रश्नावर जागृती करण्याचे काम अभिनेत्री त्रिशा करणार आहे. 

युनिसेफ 

संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे.