डॉ. मोहन आगाशे यांना भावे पदक

0
236

नाट्यक्षेत्रात मानाचे समजले जाणारे आद्यनाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर करण्यात आले.

रंगभूमीदिनी ५नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते पदक प्रदान सोहळा होणार आहे. डॉ. कराळे म्हणाले, ‘रंगभूमीसाठी प्रदीर्घ काळ योगदान देणाऱ्या गुणवंत कलाकाराला भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदाचे हे त्रेपन्नावे वर्ष आहे. गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मानसशास्त्र वैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापक आणि पुण्यातील ससून रुग्णालयात मानसोपचारतज्ञ म्हणून सेवा देणारे डॉ. मोहन आगाशे यांचा लहानपणापासूनच रंगभूमीकडे ओढा होता.