डॉ बाबासाहेब आंबेडकर : व्यक्ती नही संकल्प

0
21

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर: व्यक्ती नही संकल्प’ या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे अनावरण भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे संपादक किशोर मकवाना हे आहेत.

  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर: व्यक्ती नही संकल्प‘ या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
  • या पुस्तकाचे अनावरण भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे संपादक किशोर मकवाना हे आहेत.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय भारतीय, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होते. याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते. इ.स. 2014 साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या 100 बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे