डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची देशाचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती

0
406

केंद्र सरकारने इंडियन स्कूल ऑफ बिझीनेस येथे प्राध्यापक म्हणून कार्य करत असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यण यांची देशाचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

• त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. सद्या या पदावर कार्यरत असलेले अरविंद सुब्रमण्यण यांनी जुलै महिन्यात व्यक्तिगत कारणांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
• डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे सद्या इंडियन स्कूल ऑफ बिझीनेस येथे फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत.
• त्यांनी आयआयटी आणि आयआयएम येथे आपले शिक्षण घेतले असून शिकागो येथे आपली पीएचडी केली आहे. त्यांची गणना जगातील उच्च स्तरीय बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक पोलिसी तज्ञांमध्ये केली जाते.
• सेबीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स तज्ञांची समिती आणि आरबीआयसाठी बँकांच्या गव्हर्नर्सचे काम करणाऱ्या समितीचा भाग असण्याबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भारतात बँकिंग सुधारणांसाठी त्यांना ओळखले जाते.
• सुब्रमण्यण हे वैकल्पिक गुंतवणूक धोरण, प्राथमिक-माध्यमिक बाजार आणि संशोधनावर आधारित सेबीच्या समितीचा भागही राहिले आहेत.