डेन्मार्क ओपनचे विजेतेपद किदांबी श्रीकांतकडे

0
14

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने अगदीच एकतर्फी लढतीत आज येथे डेन्मार्क ओपनच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्युन इल याचा पराभव करीत विजेतेपद पटकावले.

# भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने अगदीच एकतर्फी लढतीत आज येथे डेन्मार्क ओपनच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्युन इल याचा पराभव करीत विजेतेपद पटकावले.

# कोरियाच्या ली ह्यूनचा सरळ गेममध्ये पराभव करत ७ लाख ५० हजार डॉलर इनाम असलेल्या डेनमार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा किताब पटकावला. 

# या वर्षी इंडोनेशिया ओपन आणि आॅस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद पटकावणाºया आठव्या मानांकित श्रीकांतने ओडेंसे स्पोर्टस् पार्कमध्ये आपल्यापेक्षा १२ वर्षांनी मोठा असणाºया ली याचा अवघ्या २५ मिनिटांत २१-१०, २१-०५ असा धुव्वा उडवला.

# जागतिक क्रमवारीतील श्रीकांतचे हे तिसरे सुपर सीरिज प्रीमिअरचे विजेतेपद आहे. 

# या वर्षात सलग दोन सुपर सीरिज जिंकणारा श्रीकांत पहिलाच भारतीय खेळाडू आहे. तर वर्षात चार सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यांपर्यंत मजल मारणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

# यापूर्वी किदांबीने इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपनचे किताब जिंकले होते