डेनिस मुक्वेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल जाहीर

0
303

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या शांततेच्या नोबेल पुरस्कारांची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. डेनिस मुक्वेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद या दोघांना संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल या दोघांना शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात येणार आहे.

 नॉर्वेच्या नोबेल समितीने मुक्वेगे आणि मुराद यांची निवड केली. यंदा या पुरस्कारासाठी २१६ लोक आणि ११५ संघटनांना नामांकन देण्यात आले होते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात या दोघांना सन्मानित केले जाणार आहे.दरवर्षी हा पुरस्कार त्या व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीने जागतिक शांततेसाठी आपले योगदान दिलेले असेल किंवा शांततेसाठी प्रयत्न केला असेल. या वर्षी या पुरस्कारासाठी ३१ लोकांना नामांकन देण्यात आले होते. नोबेल पुरस्कारांमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार महत्वाचा मानला जातो. या पुरस्कारासाठी ज्यांचे नामांकन दिले जाते त्यांचे नाव गुप्त ठेवले जाते. या नामांकनामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन आणि पोप फ्रान्सिस यांसारख्यांच्या यांचा समावेश होता.

यंदा जाहीर झालेल्या शांततेच्या नोबेलचे पुरस्कर्ते मुक्वेगे यांनी युद्ध प्रसंगी लैंगिक शोषण झालेल्या पीडितांचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांची सहकारी नादिया मुराद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी स्वतःवर झालेला आणि दुसऱ्यांवर झालेल्या शोषणाविरोधात लढा दिला आहे.