डी के जैन यांची राज्याच्या मुख्यसचिवपदी नियुक्ती

0
16

नेहमीचे सेवाज्येष्ठतेचे नियम डावलून राज्याच्या मुख्यसचिवपदी डी.के.जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यसचिव सुमित मल्लिक हे लवकरच निवृत्त होणार आहे. ते निवृत्त झाल्यावर त्यांची जागा आता डी के जैन घेणार आहे. डी के जैन 1983 च्या बॅच चे आय ए एस अधिकारी आहेत.

सध्या   अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून  मेधा गाडगीळ , सुधीर श्रीवास्तव , काम पाहत आहेत. पण या दोघांना डावलून जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच  यूपीएस मदान याना डावलून जैन यांना नियुक्ती. करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार जैन  चौथ्या क्रमांकावर  होते.  लवकरच डी के जैन आपला पदभार सांभाळणार आहेत .

डी के जैन आता महाराष्ट्रासमोरील आव्हानांना कसं सामोरं जातात हे  पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत डी. के. जैन नवे मुख्य सचिव

– 1983 बॅचचे आयएएस अधिकारी

– सध्या अर्थ खात्याचे मुख्य सचिव

– 5 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार

– सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार जैन

– केंद्र सरकारमध्येही कामगिरी बजावली

– अनेक खात्यांमध्ये कामाचा अनुभव