डीआरडीओच्या प्रमुखपदी जी.सतीश रेड्डी यांची नियुक्ती

0
315

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रमुखपदी वरिष्ठ शास्त्रज्ञ जी.सतीश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. डीआरडीओचे प्रमुखपद तीन महिन्यांपासून रिक्त होते.

याआधीचे प्रमुख एस.ख्रिस्तोफर यांचा कार्यकाळ चालू वर्षी मेमध्ये समाप्त झाला. त्यानंतर संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्याकडे त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. आता डीआरडीओला पूर्णवेळ प्रमुख लाभला असून रेड्डी यांना दोन वर्षांचा कार्यकाळ लाभेल. याच कालावधीसाठी ते संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या सचिवपदाचीही जबाबदारी सांभाळतील.

लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी लागणारी सामग्री विकसित करण्याचे महत्वपूर्ण कार्य डीआरडीओ करते.