टी.एम. कृष्णा यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार

0
102

कर्नाटकी गायक टी.एम. कृष्णा यांन अ2015- 16 या वर्षासाठीचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला आहे.

कर्नाटकी गायक टी.एम. कृष्णा यांन अ2015- 16 या वर्षासाठीचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. देशातील राष्ट्रीय एकात्मता जतन करणे आणि वाढीस लावण्याबद्दल कृष्णा यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे, कृष्णा यांना 2016 सालचा “सोशल इन्क्‍ल्युजिव्हनेस इन कल्चर’ साठी रामन मेगासेसे पुरस्कार दिला गेला होता. 

कृष्णा हे कर्नाटकी शास्त्रीय संगीतातील अनन्यसाधारण योगदान देणारे केवळ प्रमुख कलाकारच आहेत, असे नाही. तर संगीतामध्ये समानतेचा आग्रह धरणारे आणि जातींच्या भिंती मोडणारे अग्रणीही आहेत. श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांतामध्ये तामिळींच्या आंदोलनामध्येही कृष्णा सहभागी झाले होते. याशिवाय शास्त्रीय संगीताच्या परंपरेची फेररचना करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.

कृष्णा हे स्तंभलेखकही असून त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय विषयांवर लेखनही केले आहे. यामध्ये महिलांचे हक्क, बालकांच्या गरजा, सामाजातील मानसिक द्वंद्व आणि संकुचित राष्ट्रवादीवृतींमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांबाबत त्यांनी लेखन केले आहे.

यापुर्वी स्वामी रंगनाथानंद, स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफअली, भारत स्काउट ऍन्ड गाईडचे उर्ध्वयु पी.एन. हाकसर, गायिका एम.एस.सुब्बुलक्ष्मी, माजी पंतप्रधान राजीव गांधी (मरणोत्तर) आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शंकर दयाळ शर्मा (मरणोत्तर) यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार देण्यात आला आहे.

इंदिरा गाँधी राष्ट्रीय एकता पुरस्कार

इंदिरा गाँधी राष्ट्रीय एकता पुरस्कार एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे ज्याची स्थापना भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने शताब्दी वर्ष 1985 ला केली होती. राष्ट्रीय एकता किंवा सद्भावना च्या विचारांना जपून ठेवण्याच्या दिशेने अनुकरणीय योगदान देण्यासाठी ही संस्था हा पुरस्कार देते. या पुरस्काराने सन्मानित करण्याऱ्या व्यक्तीला 5 लाख रुपयांची रक्कम आणि प्रमाण पत्र देण्यात येते. हा पुरस्कार भारताची प्रथम प्रधानमंत्री इंदिरा गांधी च्या बलिदान दिवस 31 ऑक्टोबर ला दिला जातो.