झारखंडमध्ये 28 लाख शेतकऱ्यांना मोफत मोबाइल फोन देणार राज्य सरकार : मुख्यमंत्री रघुबर दास

0
297

29 नोव्हेंबर, 2018 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी जाहीर केले की, राज्य सरकार 28 लाख शेतकऱ्यांना मोफत मोबाइल फोन आणि 2019/2021 पर्यंत कृषी प्रयोजनासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक फीडर उपलब्ध करून देणार.

रांचीमधील दोन दिवसांच्या कृषी व खाद्य समिटच्या उद्घाटन समारंभात बोलताना बोलताना मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, शेतक-यांच्या शेतीसाठी मे 2019 पर्यंत वेगळा इलेक्ट्रिक फीडर तयार केला जाईल आणि त्याद्वारे सहा तास निर्बाध वीज उपलब्ध केली जाईल.

ठळक वैशिष्ट्ये

• शेतकऱ्यांना मध्यस्थांपासून दूर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना बाजाराविषयी अधिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मोबाइल फोन दिले जातील.
• हे पाऊल शेतकऱ्यांना बाजार दर आणि शेतीशी संबंधित इतर माहिती सरळरित्या उपलब्ध करण्यास मदत करेल.
• याव्यतिरिक्त, डिसेंबर 2018 पर्यंत सर्व कुटुंबांना वीजपुरवठा होईल आणि मे 2019 पर्यंत शेती, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी स्वतंत्र फीडर्स तयार केले जातील.
• ऑगस्ट 2019 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागामध्ये 24×7 वीजपुरवठा उपलब्ध होईल.
• मुख्यमंत्री रघुबर दास यांनी चार वर्षापूर्वी नोंदणीकृत (-4.5) टक्के पासून कृषी विकास दर 14 टक्के पर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांना श्रेय दिला.
• त्यांनी सांगितले की कृषी वाढीस आणखी प्रोत्साहन देण्यासाठी, राज्याच्या शेतक-यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे आणि ते बाजारातील चालू घडामोडींशी परिचित होणे आवश्यक आहे.