ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे उपोषणादरम्यान निधन

0
159

आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक आणि गंगा नदीच्या शाश्वतीसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचे आज निधन झाले. गंगा नदीच्या शाश्वतीसाठी 22 जूनपासून ते आमरण उपोषण करत होते. या उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गंगा नदी वाचविण्यासाठी गेल्या 109 दिवसांपासून जे. डी. अग्रवाल उपोषणाला बसले होते. त्यांना उत्तराखंड पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेले आणि त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांचे निधन झाले. गंगा वाचविण्यासाठी दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेवर लक्ष दिले नाही.