ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचं निधन

0
20

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते.

अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. १९६२मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’…’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’….’दिवस तुझे हे फुलायचे’…’अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’…आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’…अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केलं.