जुजेपी कोंटे इटलीचे नवे पंतप्रधान

0
14

जुजेपी कोंटे यांनी आज इटलीचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आघाडी सरकारचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोंटे हे पतंप्रधानपदी विराजमान झाले असून आजच्या शपथविधीनंतर गेल्या काही महिन्यांपासून इटलीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

नवं सरकार स्थापन झाल्यामुळे इटलीत फेरनिवडणुका टळल्या आहेत. कोंटे हे शिक्षणतज्ञ असून त्यांचा राजकारणातील अनुभव अगदीच तोकडा आहे. त्यामुळे ते सरकारचा गाडा कसा हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.