जागतिक स्नूकर स्पर्धेत पंकज अडवानीला सुवर्णपदक

0
17

भारताच्या पंकज अडवानीने जागतिक स्नूकर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सोमवारी त्याने लागोपाठ दोन विजय नोंदविताना उपांत्य आणि अंतिम फेरीत बाजी मारली.

# अंतिम फेरीत त्याने इराणच्या आमिर सारखोस, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या फ्लोरियन नबल याला हरविले. पंकजला उपांत्य फेरीत संघर्ष करावा लागला.

# पंकजने १-२ अशा पिछाडीवरून सलग तीन फ्रेम जिंकल्या.  दुसऱ्यात ५८, चौथ्यात ५७, पाचव्यात ६७, तर राहाव्यात ५० असे अर्धशतकी ब्रेक त्याने नोंदविले.

पंकजचे पराक्रम :

कारकिर्दीतील १८ वे जागतिक विजेतेपद

बिलिडियर्स १३ वेळा विश्वविजेता

गुणांच्या स्वरूपात पाच तर वेळेच्या स्वरूपात सात वेळा यशस्वी.

जागतिक सांघिक विजतेपद एकदा

जागतिक स्नूकरमध्ये तीन वेळा बाजी (२००३,२०१५, २०१७ वर्ष)

६ रेड स्नूकरमध्ये दोनवेळा बाजी.