जागतिक व्यापार मेळ्यात स्टार्टअप आणि स्टॅंडअप महाराष्ट्र

0
17

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. स्टार्टअप इंडिया या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा स्टार्टअप आणि स्टॅंडअप महाराष्ट्र साकारला आहे.

# जागतिक व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने स्टार्टअप आणि स्टॅंडअप महाराष्ट्र हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

# संकल्पना मांडताना राज्यात “स्टार्टअप आणि स्टॅंडअप’योजनेच्या माध्यमातून नव्याने उद्योग उभारणी करणा-या राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे प्रकल्प दर्शविण्यात आले आहेत. 

# प्रदर्शनात या योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणा-या राज्यातील 60 उद्योजकांचे स्टॉल्स आहेत. अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेल्या विमानाची प्रतिकृती दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण आहे.

# राज्यातील लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे निर्मित वस्तू, महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले आहे.

‘स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया’ : 

स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हे मोदी सरकारनं भारतातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक नवीन मोहिम सुरू केली आहे. स्टार्टअप इंडिया स्टँडयुप इंडिया ही 16 जानेवारी 2016 रोजी मोदी सरकारद्वारे सुरूकेलेली एक योजना आहे.