जागतिक रँकिंगमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर

0
19

गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं. यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर आहेत, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.

मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही मागे टाकलं आहे. 2015 साली या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते.

जागतिक रँकिंग

1. अँजेला मर्कल (चान्सलर, जर्मनी)

2. इमॅनुअल मॅक्रां (फ्रान्सचे अध्यक्ष)

3. नरेंद्र मोदी (पंतप्रधान, भारत)

4. थेरेसा मे (पंतप्रधान, इंग्लंड)

5. शी जिनपिंग (अध्यक्ष, चीन)

6. व्लादिमीर पुतीन (अध्यक्ष, रशिया)

7. सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद (सौदीचे राजे)

8. नेत्यानाहू (इस्रायल पंतप्रधान)

9. हसन रोहानी (पंतप्रधान, इराण)

10. इद्रोगान (अध्यक्ष, तुर्कीस्तान)

11. डोनाल्ड ट्रम्प (अध्यक्ष, अमेरिका)