जागतिक तंबाखू विरोधी दिन – 31 मे

0
57

जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात 31 मे 2018 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभरात पाळला जातो. यावर्षी हा दिवस “टोबॅको अँड हार्ट डिसीज” या संकल्पनेखाली पाळण्यात आला. 31 मे या दिवशी तंबाखू सेवनामुळे उद्भवणार्‍या समस्यांच्या बाबतीत जागृती निर्माण केली जाते.

# जागतिक तंबाखू विरोधी दिन पहिल्यांदा 7 एप्रिल 1988 रोजी WHO च्या वर्धापन दिनी पाळला गेला होता. त्यानंतर WHO च्या सदस्य राष्ट्रांकडून सन 1987 मध्ये दरवर्षी 31 मे या तारखेला जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्याचे मान्य करण्यात आले.

 

# जगात दरवर्षी साधारणत: 60 लक्ष लोक तंबाखू सेवनामुळे दगावतात. हाच कल पुढेही सुरु राहिल्यास सन 2030 पर्यंत तंबाखूमुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या अंदाजे 80 लक्षच्या घरात असू शकते.

# भारतातही तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या देशातील एकूण कर्करुग्णांच्या 30% आहे. भारतात सध्या सुमारे 25 लक्ष कर्करुग्ण आहेत. त्यात वर्षाला 7 लक्ष लोकांची भर पडते.

तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम 

तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो. शिवाय यामधून उद्भवणारा आर्थिक भार दिवसेंदिवस वाढत जातो, जे देशाच्या आर्थिक विकासास प्रभावित करते. हृदयविकारासाठी कारणीभूत असणाऱ्या दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण 25% नी कमी होते असे एका अभ्यासामधून आढळून आले आहे.

भारताच्या उपाययोजना

तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी ‘कोटपा अधिनियम-2003’ हा तंबाखू नियंत्रण कायदा तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करतो. यामध्ये 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही. शाळेपासून 100 मीटरच्या परिसरात पान टपरीला परवानगी नाही. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी अशी काही बंधने आहेत.