जागतिक कर्करोग दिवस – 4 फेब्रुवारी

0
19

दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा दिवस जागतिक आरोग्य संस्था (WHO) कडून जागतिक कर्करोग दिवस जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे पाळला जात आहे. वर्ष 2016-2018 दरम्यानच्या ‘वुई कॅन. आय कॅन.’ या मोहिमेअंतर्गत (ही संकल्पना सुद्धा आहे) या दिवशी जगातील सर्वात प्राणघातक रोगाशी लढण्याकरिता अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्याच्या अर्थाने आयोजित केला. ‘वुई कॅन. आय कॅन.’ मोहीमेचे हे तिसरे वर्ष आहे.

# जागतिक कर्करोग दिवस हा दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहित करण्याकरिता आयोजित केला जातो. या दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ने वर्ष 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’ चे समर्थन करण्यासंदर्भात केली होती.

# भारतात दरवर्षी 2.2 दशलक्ष लोक कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात. यासंदर्भात कर्करोगाचे प्रमाण पुरुषाहून अधिक महिलांमध्ये आहे. हे चित्र पाहता भारत सरकारकडून देशभरात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम राबवविला जात आहे.

भारतात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये 5 योजनांचा समावेश आहे

  • 5 कोटी रुपयांचे एकदाच अनुदान उपलब्ध करून नवीन प्रादेशिक कर्करोग केंद्र (RCCs) उभारणे.
  • 3 कोटी रुपयांचे एकदाच अनुदान उपलब्ध करून विद्यमान RCCs बळकट करणे.
  • सरकारी संस्था (वैद्यकीय महाविद्यालये तसेच सरकारी रुग्णालये) यांना 3 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून ऑन्कॉलॉजी विभाग उभारणे.
  • 5 वर्षांच्या कालावधीत 90 लाख रुपये प्रदान करून जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रम चालवणे.
  • IEC उपक्रमसाठी स्वयंसेवी संस्थांना प्रति मोहिमेमागे 8000 रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यास विकेंद्रित स्वयंसेवी संस्था योजना राबवणे.

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) :

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी, जगभरात 160 देशांमध्ये 1000 सदस्य असलेली संस्था आहे. यांच्यामध्ये जगातील प्रमुख कर्करोग संस्था, आरोग्य मंत्रालये, संशोधन संस्था, उपचार केंद्रे आणि रुग्णाचे समूह सदस्य आहेत. ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे. UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत. UICC हा NCD युतीचा संस्थापक सदस्य देखील आहे. NCD युती हे 170 देशांमधील जवळजवळ 2,000 संस्थांचे एक जागतिक नागरी समुदाय जाळे आहे.