जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल

0
92

दरवर्षी 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो. 7 एप्रिल 2018 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात ‘जागतिक आरोग्य दिन’ जगभरात पाळला जात आहे.

यावर्षी हा दिवस “युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजएव्हरीवनएव्हरीव्हेयर” या विषयाखाली पाळला गेला आहे.

इतिहास

948 साली WHO ने प्रथम ‘जगातील आरोग्य सभा’ आयोजित केली होती. या सभेत दरवर्षी 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 1950 सालापासून प्रभावी करण्यात आला. प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय निवडला जातो. या दिनी विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती निर्माण केली जाते.

जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा पुढीलप्रमाणे आहेत – जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण सप्ताह, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.