जपानची नाओमी ओसाका हिने 2019 मधील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस महिला पुरस्कार जिंकला

0
312

जपानमधील नाओमी ओसाका हिने 26 जानेवारी 2019 रोजी सीझनचे पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. जागतिक क्रमवारीत ती आता पहिली आशियाई महिला बनली आहे.

• 2010 नंतर हे विक्रम नोंदविणारी ती सर्वात तरुण खेळाडू बनली आहे. ओसाका ने रॉड लेव्हर एरेना च्या फाइनलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवा हिला पराभूत केले.
• मेलबर्न पार्क येथे नाओमी ओसाकाने दोन तास आणि 27 मिनिटांत विजय मिळविला.
• ग्रँड स्लॅम टूर्नामेंटमध्ये 21 वर्षीय ओसाकाची ही दुसरी ट्रॉफी आहे. याआधी ती यूएस ओपनमध्ये चॅम्पियन बनली होती. त्यात तिने अमेरिकेच्या सेरेना विलियम्सचा पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियन ओपन :

• ही चार ग्रँड स्लॅम पैकी एक टेनिस स्पर्धा आहे.
• ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात मेलबर्न शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते.
• ही स्पर्धा 1905 साली प्रथम खेळवली गेली.
• 1987 पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु 1988 सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.
• ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोजन केले जाते.

नाओमी ओसाका :

• नाओमी ओसाका ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
• जपानमध्ये जन्मलेल्या ओसाकाचे वडील हैतीचे असून आई जपानी आहे. ओसाका तीन वर्षांची असल्यापासून अमेरिकेत राहत आहे.
• ती उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
• तीची बहीण मरी ओसाकासुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
• सप्टेंबर 2018 मध्ये तिने 23 वेळेची प्रमुख चॅम्पियन सेरेना विल्यम्स विरुद्ध फाइनलमध्ये ग्रँड स्लॅम सिंगल्स स्पर्धा जिंकून यू.एस. ओपन जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली जपानी खेळाडू बनली.
• ओसाका आपल्या आक्रमक खेळाच्या शैलीसाठी ओळखली जाते. कोर्टाबाहेर, ती तिच्या लाजाळू, स्पष्ट व्यक्तिमत्त्व आणि तिच्या विनोदासाठी ओळखली जाते.