जनता सहकारी बॅंकेला बॅंकिंग फ्रंटियरचे प्रतिष्ठेचे पुरस्कार

0
17

बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बॅंकिंगसेवा देणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेला बॅंकिंग फ्रंटियरच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट अध्यक्ष आणि डेटा सेंटर (मोठ्या बॅंकांचा वर्ग) सीबीएस अपग्रेडेशन असे हे दोन पुरस्कार आहेत.

बॅंकेने 2016-17 या आर्थिक वर्षात 14163.43 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला. त्यामध्ये 8472.36 कोटी रुपयांच्या ठेवी व 5691.07 कोटी रुपयांच्या कजारचा समावेश आहे. या आर्थिक वर्षात बॅंकेला 36.11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. सन 2016-17 या आर्थिक वर्षात बॅंकेने सात नवीन शाखा आणि दोन केंद्रीय संस्करण केंद्र सुरू केली.

जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या 70 शाखा कार्यरत असून बॅंकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स2) सुमारे रुपये 14 हजार 300 कोटींपेक्षा अधिक आहे.