जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था क्रमवारीत भारत UKला मागे टाकण्याची पूर्ण शक्यता

0
515

ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म पीडब्ल्यूसीच्या अहवालानुसार 2019 मध्ये भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था क्रमवारीत युनायटेड किंग्डमच्या पुढे येण्याची अपेक्षा आहे.

• पीडब्ल्यूसीच्या ग्लोबल इकोनॉमी वॉच अहवालानुसार, युके आणि फ्रान्स विकास आणि समान लोकसंख्या यासारख्या समान स्तरांमुळे वारंवार मागेपुढे स्थान बदलत राहतात, परंतु भारताचे स्थान कदाचित कायम राहील.

ठळक वैशिष्ट्ये

• पीडब्ल्यूसी अहवालात यूकेसाठी 1.6 टक्के वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज आहे, तर फ्रान्ससाठी 1.7 टक्के आणि 2019 मध्ये भारतासाठी 7.6 टक्के वास्तविक विकास अपेक्षित आहे.
• जीडीपी वाढीच्या अंदाजानुसार, भारत आणि फ्रान्स 2019 मध्ये जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था क्रमवारीत यूकेला मागे टाकतील, ज्यामुळे युके जागतिक स्तरावर पाचव्या स्थानापासून सातव्या स्थानावर घसरेल.
• जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये भारत 2.59 ट्रिलियन डॉलर्सचे जीडीपी असलेले सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि फ्रान्सला मागे टाकले. फ्रान्सची जीडीपी 2.58 ट्रिलियन डॉलर्स इतकी होती.
• या माहितीनुसार सध्याच्या ब्रॅक्सिट परिस्थितीचा सामना करत असलेल्या युकेची जीडीपी 2.62 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे, जे संख्यानुसार अंदाजे भारतापेक्षा 25 अब्ज डॉलर्स जास्त आहे.

पार्श्वभूमी

• 2017 मध्ये, 19.79 ट्रिलियन डॉलर्स सोबत अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती तर त्यानंतर मध्ये चीन (12.23 ट्रिलियन डॉलर्स) दुसऱ्या क्रमांकावर होते.
• जपान (4.87 ट्रिलियन डॉलर्स) आणि जर्मनी (3.67 ट्रिलियन डॉलर्स) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते.
• यूके आणि फ्रान्स बहुतेक पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी आपले स्थान बदलत राहिले आहेत, परंतु 2018 मध्ये झालेल्या आणि त्यानंतर 2019 मध्ये सूद्धा होणाऱ्या युकेच्या कमी वाढीमुळे याचा फायदा भारत आणि फ्रान्सला होईल अशी अपेक्षा आहे.