जगातील पहिला अतिसूक्ष्म रोबो तयार

0
22

जगातला पहिला अतिअतिसूक्ष्म मोलेक्युलर रोबो बनविण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले असून भविष्यात या रोबोंचा वापर आरोग्य चिकित्सा व औषध निर्माण क्षेत्रासाठी होऊ शकणार आहे. हा रोबो इतका सूक्ष्म आहे की असे अब्जावधी रोबो एकत्र जोडले तर ते मिठाच्या एका कणाएवढे दिसतील.

सर्व जगाची उत्पत्ती रेणूंपासून झाली असून अनेक रेणू एकत्र आले की त्यापासून अणु बनतो. आपण विटा जोडून ज्या प्रमाणे एखादे बांधकाम उभे करतो त्याच पद्धतीने रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या अणुंपासून हा रोबो बनला आहे.

अतिअतिसूक्ष्म मोलेक्युलर रोबो बनविण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले असून भविष्यात या रोबोंचा वापर आरोग्य चिकित्सा व औषध निर्माण क्षेत्रासाठी होऊ शकणार आहे. हा रोबो इतका सूक्ष्म आहे की असे अब्जावधी रोबो एकत्र जोडले तर ते मिठाच्या एका कणाएवढे दिसतील. म्हणजे नुसत्या नजरेने हा रोबो पाहणे दुरापास्त आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर मधील वैज्ञानिकांनी हे रोबो तयार केले आहेत. त्यात हैड्रोजन, कार्बन व नायट्रोजन चे १५० रेणू एकत्र केले गेले आहेत. नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.