जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

0
21

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

# विज्ञानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे ख्यातनाम ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले. विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या सदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. 

स्टीफन हॉकिंग :

# स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक आणि आई इझाबेल ऑक्सफर्डच्या पदवीधर होत्या.

# हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान विषयात त्यांना रस होता. 1959 साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती.

# त्यांनी 1962 साली ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी 30 वर्षे गणिताचे अध्यापन केले.

# वयाच्या अवघ्या 21 वर्षी जडलेल्या दुर्धर ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ नामक आजारामुळे त्यांचे संपूर्ण शरीर अधू असूनही त्यांनी जिद्दीने आपला प्रवास केला.

# हॉकिंग यांची अल्बर्ट आइनस्टाइन आणि सर आयझॅक न्यूटन यांच्याशी तुलना केली जाते.

# विश्वशास्त्र (cosmology) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते.

# 2009 साली त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते. शिवाय त्यांना कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर ही पदवी बहाल केली होती.

# हॉकिंग यांनी लिहलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘द ग्रँड डिझाईन’, ‘युनिव्हर्स इन नटशेल’, ‘माय ब्रीफ हिस्ट्री’, ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित ‘ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक खूप गाजले.