छत्तीसगडच्या राजधानीचे नाव होणार “अटल नगर’

0
377

छत्तीसगड राज्याच्या नव्या राजधानीचे नाव अटल नगर ठेवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केली आहे. त्याचबरोबर विलासपूर विश्‍वविद्यालयाचे नाव बदलून ते अटलजींच्या नावात बदलणार असल्याचे आणि राजधानीत सुमारे 5 एकर जागेत अटलजींचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे.

छत्तीसगड मंत्रालयाच्या माहनदी भवनात  छत्तीसगड मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात छत्तीसगडची नवीन राजधानी नया रायपूरचे नाव बदलून ते अटल नगर करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा आहे. नया रायपूर आता अटल नगर या नावानेच ओळखले जाणार आहे.