चीन करणार महाराष्ट्रात गुंतवणूक

0
12

महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्सपासून कृषीक्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्याची इच्छा चिनी उद्योजकांनी व्यक्त केली आहे. चीनच्या सिचुआन प्रांतातील उद्योजकांनी देसाई यांची सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.

चिनी उद्योजकांच्या शिष्टमंडळात सिचुआन प्रांताचे उपाध्यक्ष पेन युसिंग, उपसचिव ज्यू जियाद, सिचुआन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी विभागाचे महासंचालक लियो डोंग आदींचा समावेश होता. देशात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात वीज, पाणी, जमीन आणि कुशल मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत आहे.

सिचुआन हा चीनमधील सर्वांत मोठा प्रांत असून त्यांच्या एकूण उत्पादनात सिचुआनचा ४० टक्के वाटा आहे. इलेक्ट्रॉनिक्स, उद्योग, पर्यावरण, वाहतूक, पायाभूत सुविधा, रस्ते, महामार्ग बांधकाम, पर्यटन, कला, ऊर्जा, टेलिकॉम, अन्न व कृषी उद्योग आदी क्षेत्रांत गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे सिचुआन प्रांताचे उपाध्यक्ष पेन युसिंग यांनी सांगितले.