चीनमध्ये अध्यक्षपदाची दोन कार्यकालांची मर्यादा रद्द

0
17

चीनच्या संसदेने आज घटनादुरुस्ती करीत अध्यक्षपदाची असणारी दोन कार्यकालांची मर्यादा रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

# चीनच्या संसदेने आज घटनादुरुस्ती करीत अध्यक्षपदाची असणारी दोन कार्यकालांची मर्यादा रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यामुळे चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जीनपिंग हे तहयात या पदावर राहू शकणार आहेत.

# या बदलामुळे चीनच्या सर्वशक्तिमान कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक माओ झेडॉंग यांच्यानंतर हा मान मिळालेले जीनपिंग हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत.

# कम्युनिस्ट पक्ष आणि लष्कर यांचे अध्यक्ष असलेले जिनपिंग हे चीनच्या काही दशकातील सर्वाधिक शक्तिमान अध्यक्ष मानले जातात.

# अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ लवकरच सुरु करणाऱ्या जिनपिंग यांना तहयात अध्यक्षपदावर ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीने काही दिवसापूर्वी झालेल्या पक्षबैठकीत दोन कार्यकालांची मुदत रद्द करण्याचा निर्णय घेतला.

# चीनची पहिली राज्यघटना १९५४ मध्ये अमलात आली. सध्याची राज्यघटना १९८२ पासून अमलात असून, यामध्ये १९८८, १९९३, १९९९ आणि २००४ मध्ये घटनादुरुस्ती कम्युनिस्ट पक्षातील सर्वोच्च अधिकार असलेल्या स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली.

# अध्यक्षपदाची कालमर्यादा आता संपुष्टात आली असून, चीनचे रूपांतर एकपक्षीय राजवट असलेल्या देशाकडून एका व्यक्तीची राजवट असलेल्या देशात झाली आहे. आणि जिनपिंग हे या राजवटीचे ‘सम्राट’ ठरले आहे.