चीनने केली बीजिंगमध्ये इंटरनेट न्यायालयाची स्थापना

0
378

चीनने बीजिंग येथे इंटरनेट न्यायालयाची स्थापना केली आहे. ऑनलाईन विवादांचे निर्णय घेण्यासाठी या इंटरनेट न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. बीजिंगमधील या पहिल्या इंटरनेट न्यायालयासाठी मुख्य न्यायाधीश, त्याचप्रमाणे अन्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीजिंग नगरपालिकेच्या जन महाअधिवेशनाच्या 15 व्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

के झांग वेन (50 वर्षे) यांची मुख्य न्यायाधीश म्हणून, तर अन्य 40 जणांची न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली.
चीनधील पहिले इंटरनेट न्यायालय गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गुआंगझाओ प्रांतात स्थापन करण्यात आले. या न्यायालयातील न्यायाधीशांचे सरासरी वय 40 वर्षे असून त्यांना आपल्या क्षेत्रातील 10 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.