चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार

0
301

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत आज तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या फेरमतमोजणीत अभिनेते सुशांत शेलार हे विजय झाले आहेत.

तब्बल अडीच वर्षानंतर एप्रिल 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची फेरमतमोजणी घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले. कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आज फेरमतमोजणी घेतली सकाळी 11 वाजल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात ही मतमोजणी सुरू होती सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अभिनेता सुशांत शेलार यांना 591 मत पडल्याचं सांगितलं तर अभिनेता विजय पाटकर यांना 575 मत पडल्याचं जाहीर केलं. सर्वाधिक मत सुशांत शेलार यांना मिळाल्याने सुशांत शेलार सोळा मताने विजयी झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.