चालू घडामोडी – 5 जून

0
24

5 जून रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षे साठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यत्न आहे. दररोज फक्त 5 मिनट द्या चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालूघडामोडी ह्या विषयाचे अभ्यास होयील.

सूर्यमालेबाहेर ग्रहावर पाणी आणि धातूचे चिन्ह आढळले

खगोलशास्त्रज्ञांना सूर्यमालेबाहेर ग्रहावर पाण्याचे आणि विविध धातूंची संभाव्य चिन्हे आढळून आली आहेत. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठ आणि स्पेनमधील इन्स्टिटुटो डी एस्ट्रोफिसिका डी केनारियस (IAC) येथील शास्त्रज्ञांच्या चमूने ग्रेएस् टेलिस्कोपियो कॅनरियास (GTC) या वेधशाळेचा वापर करून ‘WASP-127b’ ग्रहाचा अभ्यास केला गेला.

‘अग्नि-5’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

3 जून 2018 रोजी ओडिशातील बालासोर येथून भारताच्या ‘अग्नि-5’ या स्वदेशी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली गेली. अग्नि-5 ची ही सहावी चाचणी असून आत्तापर्यंतच्या सर्व सहाही चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या ‘अग्नि-5’ या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 किलोमीटर इतकी आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. 

पेद्रो संचेझ: स्पेनचे नवे पंतप्रधान

पेद्रो संचेझ यांनी स्पेनचे पंतप्रधान पद सांभाळलेले आहे. ते पहिलेच पंतप्रधान आहेत, की ज्यांनी पदाची शपथ बायबल विना घेतली. 46 वर्षीय संचेझ हे स्पेनचे सातवे पंतप्रधान आहेत. मारियानो रखॉय यांच्या जागी संचेझ यांनी पंतप्रधान पदाचा भार सांभाळला आहे. संचेझ स्पेनच्या सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत. स्पेन हा एक युरोपीय देश आणि युरोपीय संघाचा एक सदस्य राष्ट्र आहे. हा युरोपच्या आग्नेय दिशेला इबेरियन द्वीपकल्पावर आहे. या देशाची राजधानी माद्रिद हे शहर आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे.

ओडिशा राज्य शासनाची ‘गोपालबंधू संबादिका स्वास्थ्य बिमा योजना’

ओडिशा राज्य शासनाने राज्यातील कार्यरत पत्रकारांसाठी ‘गोपालबंधूसंबादिका स्वास्थ्य बिमा योजना’ सुरू केली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात वर्तमानात कार्यरत असलेल्या 3,233 पत्रकारांना वार्षिक 2 लाख रुपयांसह आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. पत्रकाराच्या कुटुंबातील किमान पाच सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल