चालू घडामोडी – 31 ऑगस्ट 2019

0
20

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!! या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर :

भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मान मिळवला आहे. त्या ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या 

महिला अधिकारी ठरल्या आहेत. विंग कमांडर एस धामी हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. वायुसेनेच्या कमांड 

युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते.

पीएफच्या योजनेत होणार मोठा बदल; आता ड्रायव्हर, नोकरचाकरांनाही मिळणार लाभ :

आता लवकरच ड्रायव्हर, नोकरचाकर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने वंचित 

घटकांना भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत सामावून घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. सध्या मासिक किमान 15 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह 

निधीची (पीएफ) सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. पीएफची योजना राबवण्यासाठी आस्थापनांच्या मालकांना सध्याच्या नियमानुसार किमान 20 कर्मचारी 

असणं बंधनकारक आहे. तसंच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक किमान 15 हजार रुपये पगार असणं आवश्यक आहे. परिणामी, 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे 

कर्मचारी/कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, आतापर्यंत पीएफपासून वंचित राहणाऱ्यांनाही लाभ घेता यावा यासाठी लवकरच संबंधित 

कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

काश्मीरमधील प्रश्नांवर केंद्राकडून मंत्रिगटाची स्थापना :

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करून त्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एका मंत्रिगटाची स्थापना केली 

आहे. तर या मंत्रिगटात कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह व 

पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा समावेश आहे. तसेच हा मंत्रिगट कलम 370 रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर अभ्यास करणार असून त्याची पहिली बैठक ही 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार आहे. कलम 370 रद्द करून सरकारने संसदेत जम्मू काश्मीर फेररचना कायदा 2019 मंजूर केला असून त्यानुसार जम्मू व काश्मीर तसेच लडाख हे दोन 

स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येत आहेत. तर मंगळवारी जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याच्या प्रक्रियेवर एकूण पंधरा केंद्रीय मंत्रालये व 

विभागांची बैठक झाली. त्यात राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याबाबतही चर्चा झाली. जम्मू काश्मीरमध्ये केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करून तेथील परिस्थिती पुन्हा सुरळित 

करण्यावर भर देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

देशभरात 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार :

केंद्र सरकारने देशभरात 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर 

यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तर या वैद्यकीय महाविद्यालयांची 2021-22 पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा 

ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. तसेच यावेळी केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले की, नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 24 हजार 375 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. 

यामध्ये एमबीबीएसच्या 15 हजार 700 जागा असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वात मोठी विस्तार आहे.

आता व्हॉट्सअॅपवरून करता येणार उबरची तक्रार :

अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनी उबेरने देशात 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली. तर या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान, 

गाडी खराब झाल्यास, ड्रायव्हरसोबत वाद झाल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी फोन करू शकतील. तसेच यापूर्वी कंपनीच्या हेल्पलाइन सुविधेत केवळ मेसेज करण्याची मुभा होती. परंतु 

आता प्रवासी व्हॉट्सअॅपद्वारे फोन करून मदत घेऊ शकणार आहेत. उबेरच्या अॅपमध्ये असलेली ही सुविधा थेट प्रवाशांना कंपनीच्या सुरक्षा टीमसोबत बोलण्याची मुभा देणार असल्याचे 

कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षा मानकांनुसार पूर्वीपासूनच अॅपमध्ये एसओएस बटन देण्यात आले असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. याच्या सहाय्याने आपात्कालिन 

परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी जोडले जाऊ शकतो. दरम्यान, मार्च महिन्यापासून या हेल्पलाइन फिचरचा वापर चंडीगढमध्ये सुरू करण्यात आला होता. आता कंपनीने आपले परिचालन 

असलेल्या सर्व 40 शहरांमध्ये हे फिचर उपलब्ध करून दिले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये कंपनी ही सुविधा पूर्वीपासूनच देत आहे. भारतात सुरूवातीला ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी 

भाषांमध्ये उपलब्ध असेल. परंतु उबर लाइटवर ही सेवा उपलब्ध नसेल. उबरच्या सर्व ग्राहकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे.