चालू घडामोडी – 22 जुलै, 2019

0
40

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

घरगुती वीज वापरासाठी लवकरच प्रिपेड सुविधा; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा :

घरात पंखे, दिवे, एसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे. अर्थात केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत असून वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले की, भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता येणार आहे. तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

अनुसुइया उकी आणि बिस्वा भुषण यांना अनुक्रमे छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशचे राज्यपाल नियुक्त केले :

राज्यसभा सदस्य अनुसुईया उकी यांना छत्तीसगढचे राज्यपाल आणि वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे (बीएसई) अध्यक्ष बिस्वा भूषण हरिश्चंदन यांची आंध्रप्रदेशचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे. अनुसुईया उकी या राज्यसभेच्या विद्यमान सदस्य आहेत. राष्ट्रपति भवन यांनी जारी केलेल्या औपचारिक आदेशानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे नाव निश्चित केले. राष्ट्रपती भवन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगढचे राज्यपाल म्हणून सुश्री अनुसुइया उकी यांची नियुक्ती करणे, आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून श्री बिस्वास भुषण हरिश्चंदन यांची नियुक्ती करणे भारताचे राष्ट्रपती प्रसन्न आहे.

स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा अर्जुन पुरस्काराने सन्मानीत :

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील क्रिकेटपटू स्मृती मानधाना व टेनिसपटू रोहन बोपन्ना यांना भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. मात्र आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये भाग घेतल्यामुळे हे दोन्ही खेळाडू देशाबाहेर होते.

चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड :

सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच इन्कम टॅक्स ऍक्टशी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती. त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा. चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या कलम 272 नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम एक सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता आहे. कराचा भार टाळण्यासाठी नागरिकांनी चुकीचा आधार नंबर नोंदवू नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतीक्षेत्र वगळणार :

जीवनावश्यक वस्तू कायद्यातून अन्नधान्य क्षेत्राला वगळण्याचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शेती क्षेत्रातील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीची पहिली बैठक दिल्लीत झाली. जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे शेतीमालाचे दर नियंत्रित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. बिगर अन्नधान्य क्षेत्रासाठी हा कायदा कायम राहू शकतो, मात्र शेती क्षेत्रासाठी हा कायदा रद्द केला जावा वा अत्यंतिक गरजेच्या वेळीच त्याचा वापर व्हावा, असे मत समितीच्या बैठकीत मांडले गेल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेती क्षेत्र हा राज्यांचा विषय असल्याने 7 ऑगस्टपर्यंत राज्यांनी समितीला सूचना कराव्यात असे सूचवण्यात आले आहे. समितीची दुसरी बैठक मुंबईत 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.