चालू घडामोडी – 20 जानेवारी 2019

0
458

20 जानेवारी 2019 रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षेसाठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यंत आहे. दररोज फक्त 5 मिनिट द्या. चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालू घडामोडी ह्या विषयाचा अभ्यास होईल.

सी. एन. आर. राव यांना पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ जाहीर

भारताचे नामांकित शास्त्रज्ञ भारतरत्न सी. एन. आर. राव यांची पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ (Sheikh Saud International Prize for Materials Research) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावर्षीपासून संयुक्त अरब अमिरात या आखाती देशाच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड मटेरियल या संशोधन संस्थेकडून हा पुरस्कार दिला जात आहे. एक लक्ष डॉलर एवढी रोख रक्कम, एक पदक आणि चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

NROL-71: अमेरिकेचा अत्याधुनिक गुप्तचर उपग्रह

19 जानेवारी 2019 रोजी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेनी “NROL-71” या नावाचा नवा गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवला. ‘युनायटेड लॉन्च अलायन्स (ULA) डेल्टा IV हेवी रॉकेट’ या अग्निबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला गेला. हा उपग्रह ‘यू.एस. नॅशनल रिकोनिसन्स ऑफिस’द्वारे संचालित केला जाणार आहे आणि याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ उभारण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ या वास्तुचे उद्घाटन करण्यात आले. संग्रहालय दक्षिण मुंबईच्या चित्रपट विभाग संकुल येथे उभारण्यात आले आहे आणि हे संग्रहालय ऐतिहासिक काळातले गुलशन महाल आणि आणखी एक नवी इमारत अश्या दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे.

युरेनियमचा पुरवठा करण्याबाबत भारताचा उझबेकिस्तानाशी करार झाला

अहमदाबाद शहरात झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानाचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांच्यात द्वैपक्षीय बैठक पार पडली. बैठकीनंतर भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी युरेनियम या किरणोत्सर्गी पदार्थाचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबत भारतीय अणुऊर्जा विभाग आणि उझबेकिस्तानाच्या नोवोई मिनरल्स अँड मेटलर्जिकल कंपनी यांच्या दरम्यान करार करण्यात आला.