चालू घडामोडी – 20 एप्रिल

0
28

या लेखामध्ये आपण आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी थोडक्यात बघणार आहोत. या लेखाचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल.

वेंद्र प्रभुदेसाई लिखित ‘विनींग लाइक सचिन: थिंक अँड सक्सीड लाइक तेंडुलकर’

देवेंद्र प्रभुदेसाई यांनी लिहीलेल्या ‘विनींग लाइक सचिन: थिंक अँड सक्सीड लाइक तेंडुलकर’ या पुस्तकाचे अलीकडेच अनावरण करण्यात आले आहे. क्रिकेट जगतातला प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या या पुस्तकाचे प्रकाशक ‘रूपा पब्लिकेशन’ हे आहेत.

NCC चे महासंचालक : लेफ्ट. जनरल पी. पी. मल्होत्रा 

फ्ट. जनरल पी. पी. मल्होत्रा यांनी 11 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) संघटनेच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. NCC ची 1948 साली स्थापना करण्यात आली व याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या तरुणांना शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे. 

जागतिक हीमोफिलिया दिन: 17 एप्रिल

हीमोफिलिया आणि इतर अनुवांशीक रक्तस्त्रावासंबंधी विकारांविषयी जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी 17 एप्रिलला जगभरात ‘जागतिक हीमोफिलिया दिन’ पाळला जातो. या वर्षी “शेयरींग नॉलेज मेक्स अस स्ट्रॉंगर” या विषयाखाली जागतिक हीमोफिलिया महासंघ (WFH) याच्या नेतृत्वात हा दिन पाळला गेला. 1989 साली जागतिक हीमोफिलिया दिनाची स्थापना जागतिक हीमोफिलिया महासंघ (WFH) कडून करण्यात आली. WFH चे स्थापक फ्रॅंक शेनबेल यांच्या जयंतीनिमित्त 17 एप्रिलला हा दिन पाळतात.

कोरियाच्या BTS (पॉप संगीत गट) ला टाइम्स ‘पर्सन ऑफ द इयर 2018’ किताब

दक्षिण कोरियाच्या पॉप संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या BTS गटाला ‘टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2018’ हा किताब मिळाला आहे. BTS हा RM, जीन, शुगा, जे-होप, जिमिन, व्ही आणि जंगकुक या प्रसिद्ध गीतकारांचा गट आहे. BTS (बियॉन्ड द सीन) ला टाइम (TIME) या नियतकालिकेच्या ऑनलाइन वाचकांनी सर्वाधिक 15% मते मिळालीत. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे हे 5% मतांसह दुसर्‍या स्थानी तर बराक ओबामा 3% मतांसह तिसर्‍या स्थानी आहेत.

2018-19 सालासाठी भारताचा विकास दर 7.3% : जागतिक बँक

जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया आर्थिक केंद्र अहवालात, 2018-19 सालासाठी भारताचा अंदाजित विकास दर (आर्थिक वृद्धीदर) 7.3% एवढा वर्तविण्यात आला आहे. सन 2019-20 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वाढून 7.5% होणार. भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (GST) यांच्या प्रभावातून बाहेर आली आहे. सन 2017-18 मध्ये हा दर 6.7% इतका होता.