चालू घडामोडी – 18 जून, 2019

0
18

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना विमानात व्हीआयपी प्रवेश देण्यास नकार :

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेते एन. चंद्रबाबू नायडू यांना 14 जूनच्या रात्री विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तलाशीसाठी थांबावे लागले. सामाजिक माध्यमांवर चर्चेत असलेल्या एका छायाचित्रात एक सुरक्षा रक्षक नायडूंची तलाशी घेतांना दिसत आहे. तेलुगू देशम पक्ष (टीडीपी) च्या प्रमुखाला विमानासाठी व्हीआयपी प्रवेश सुद्धा नाकारण्यात आला. त्याला सामान्य प्रवाशांसह बसमध्ये विमानात जाण्यासाठी प्रवास करावा लागला. टीडीपीच्या नेत्यांसोबत एक आढावा बैठक घेतल्यानंतर नायडू हैदराबादला रवाना झाले होते. प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, आंध्रप्रदेश पोलिसांनी पूर्वी नायडू कडून एस्कॉर्ट आणि पायलट कारचे विशेषाधिकार काढून घेतले होते आणि त्यांना रस्त्यावर विशेष सुरक्षा व विशेषाधिकार नसल्याची माहिती दिली होती.

भारत 300 कोटींचे स्पाईस बॉम्ब खरेदी करणार :

भारताने इस्रायलशी 300 स्पाईस बॉम्ब खरेदी करण्याचा करार केला आहे. भारतीय हवाई दल इस्रायल सरकारकडून 100 पेक्षा जास्त स्पाईस बॉम्ब खरेदी करणार आहे. या स्पाईस बॉम्बचा वापर भारताने बालाकोट हल्ल्यात केला होता. स्पाईस बॉम्ब हे अचूक आणि भेदक क्षमतेसाठी ओळखले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हल्ल्यात याच स्पाईस बॉम्बचा वापर करण्यात आला होता. भारताने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी याच स्पाईस बॉम्बचा वापर केला होता. इस्रायलशी झालेल्या करारानुसार, येत्या तीन महिन्यांत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हे आधुनिक बॉम्ब दाखल होणार आहेत. स्पाईस बॉम्बची काही वैशिष्ट्ये – स्पाईस बॉम्बची निर्मिती राफेल कंपनीने केली आहे, अचूक लक्ष्यभेद, 60 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लक्ष्यभेद करण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘निशान इजुद्दीन’ असे मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा होता. श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारत श्रीलंकेसोबत असल्याचे जाहीर करण्यासाठी मोदीनी हा दौरा केला. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘नेबरहूड फर्स्ट’ हे दर्शवण्याचाही मोदींचा प्रयत्न असणार आहे.

रेल्वे प्रवाशांना मसाजची सुविधा, स्वागताऐवजी ट्रोलच अधिक :

लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मसाज करून घेण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा विशेष म्हणजे इंदोरहून सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांत देण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांनी ट्विटर अकाऊंटवरून दिली. मात्र प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत न करता, उलट ज्या सुविधा देत आहेत, त्याच सुविधा व्यवस्थित आणि नीट देण्याच्या सूचना सोशल मीडियावर दिल्या. रेल्वे प्रवाशांना पाहिजे त्या सुविधा रेल्वेला देणे जमत नाही, मात्र अनावश्यक सुविधा देण्याचे सत्र रेल्वे विभागाकडून सुरू आहे. प्रवाशांना रेल्वे प्रवासात सीट मिळत नाही, परिणामी रेल्वेच्या शौचालयजवळ बसून प्रवास करावा लागतो. अनेकदा रेल्वे वेळेत धावत नाही. खूप आरडाओरडा करून देखील प्रवाशांचे कोणी ऐकून घेत नाही. मात्र रेल्वे प्रशासन सोईसुविधांसाठी सदैव पुढाकार घेणाचा आव आणत आहेत. विभागीय व्यवस्थापकांनी ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट टाकली. त्यावर प्रवाशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट बंद, तर काही प्रवाशांनी विभागीय व्यवस्थापकांना जनरल डब्यातून प्रवास करण्याची विनंती केली. मात्र या मसाज सुविधेचे कोणीही स्वागत केलेले नाही.

संविधानात ‘इंडिया’ ऐवजी भारत शब्द हवा :

भारतातील धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि इतिहास गौरवशाली आहे. ‘इंडिया’ या नावातून परकेपणा जाणवतो, तर ‘भारत’मधून राष्ट्रीय एकात्मतेची झलक पहायला मिळते. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला जावा, असा ठराव स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याबाबतची माहिती मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. नीती आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच आयोगाच्या प्रस्तावांमध्ये ‘हितसंबंधांचा संघर्ष’ होत असल्याची टीका त्यांनी केली.