चालू घडामोडी – 15 जून, 2019

0
47

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चा लू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

जागतिक रक्तदाता दिवस 2019 – थीम “सर्वांसाठी सुरक्षित रक्त” :

14 जून रोजी दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस पाळला जातो. दरवर्षी लाखो लोक रक्तदान करतात ज्याने लाखो जीव वाचवण्यास मदत होते. रक्तदात्यांचे मूल्य मान्य करण्यासाठी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) जागतिक रक्तदाता दिवस प्रत्येक वर्षी 14 जून रोजी आयोजित करते. यावर्षी WHO कार्यक्रम स्वैच्छिक, न चुकता रक्तदात्यांचे रक्तदान आणि त्यांचे रक्तदान देण्याच्या आवश्यकतेविषयी जागरुकता वाढविण्यास मदत करतो आणि सर्व व्यक्ती आणि समुदायांना परवडणारी आणि वेळेवर सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पुरवठा करण्याची सुविधा मिळते हे सुनिश्चित करण्यासाठी आश्वासन देईल. जागतिक रक्तदाता दिवस 2019 थीम सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज साध्य करण्याच्या घटक म्हणून या वर्षाच्या मोहिमेची थीम रक्तदान आणि सुरक्षित रक्तदानसाठी “सर्वांसाठी सुरक्षित रक्त” अशी ठरविली गेली आहे. रक्तदात्या बनण्यासाठी आणि जगभरातील अधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी नियमितपणे प्रोत्साहित करते – रक्ताची आवश्यकता असलेल्या सर्व रूग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा स्थायी रक्ताची पुरवठा एक मजबूत पाया तयार करण्यासाठी महत्वपूर्ण असलेली कृती आहे.

योगदिन साजरा करण्यासाठी निधी नाही :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिन यंदा कसा साजरा करायचा, असा प्रश्न देशभरातील स्वयंसेवी संस्थांपुढे उभा ठाकला आहे. याचे कारण, या उपक्रमासाठीचा गेल्यावर्षीचा निधी तर अद्याप मिळालेला नाहीच, पण यावर्षी निधीसाठी अर्जदेखील मागवण्यात आलेले नाहीत. देशातील 654 जिल्ह्य़ांतील संस्था अद्याप 2018 च्या रकमेपासून वंचित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाला प्रस्ताव दिला होता. 186 देशांच्या पाठिंब्यासह तो मंजूर झाल्यानंतर 21 जून, 2015 ला जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. त्याचवर्षी आयुष मंत्रालयाने देशभरात हा उपक्रम मोठय़ा प्रमाणात आयोजित करण्यासाठी मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्रीय योग आणि निर्सगोपचार संशोधन परिषदेवर या उपक्रमाची जबाबदारी सोपवली. परिषदेने उपक्रम राबवण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयांकडून अर्ज मागवले. 654 जिल्हय़ांतून आलेले प्रस्ताव मंजूर करीत त्यांना उपक्रम घेण्याचे सुचवण्यात आले. ठरल्यानुसार पहिल्या तीन वर्षांत या संस्थांना खर्चापोटीचे एक लाख रुपये मिळाले. मात्र, 2018 चा निधी अद्यापही न मिळाल्याने स्वयंस्पूर्तीने काम करणाऱ्या या संस्था हतबल झाल्या आहेत.

बारमाही मासेमारी, आदिवासी विकासासाठी जिल्ह्य़ात जलविज्ञान केंद्र :

महाराष्ट्राला 720 किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीवर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे बारमाही मत्स्यव्यवसाय करता यावा याकरिता जलविज्ञान केंद्र उभारून अभ्यासक्रम सुरू करण्याचा मनोदय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पालघर येथे व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची पालघर येथे तातडीने उभारणी व्हावी याकरिता जागेच्या उपलब्धता आणि काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी त्यांनी गुरुवारी दौरा केला. मुंबई विद्यापीठाचा विस्तार झपाटय़ाने झाला असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मुंबई येथे येण्याची गरज भासू नये म्हणून पालघर येथे विद्यापीठ उपकेंद्र उभारण्याचा निर्णय पूर्वी झाला होता. या प्रशासकीय उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या सुमारे पाच एकर जागा तसेच येथील आदिवासी विद्यार्थी किनारपट्टीवरील विद्यार्थी ‘सिंधू स्वाध्याय’ या उपक्रमांतर्गत यांना नवनवीन अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळण्यासाठी सुमारे शंभर एकर क्षेत्रांमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. या उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी तसेच खासदार यांची भेट घेऊन शासनाने प्रस्तावित केलेल्या काही जागांची पाहणी कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालघरमध्ये केली. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावेत असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे सांगत मच्छीमारांची नवीन पिढी घडवण्यासाठी नवीन अभ्यासक्रम आणि जलविज्ञान केंद्र उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मालेगाव बॉम्ब स्फोट खटला – चार आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर :

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील धनसिंग, लोकेश शर्मा, मनोहर नवारिया आणि राजेंद्र चौधरी या चार आरोपींना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आरोपींना 2013 मध्ये अटक झाली होती. मालेगाव येथील मशिदीबाहेर 8 सप्टेंबर, 2006 रोजी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटामध्ये 37 जण मृत्यूमुखी तर 100 हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी 2013 मध्ये मनोर सिंह, राजेंद्र चौधरी, धनसिंह आणि लोकेश शर्मा या चौघांना अटक केली होती. यातील लोकेश शर्मा हा ‘समझौता एक्स्प्रेस’ स्फोट प्रकरणातीलदेखील आरोपी होता. तीन वर्षांपूर्वी लोकेश शर्मा आणि धनसिंह या दोघांना एनआयएने आरोपमुक्त केले होते.

बंगालमधील आरोग्यसेवा थांबली – 700 डॉक्टरांचे राजीनामे :

पश्चिम बंगालमधील दोन कनिष्ठ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने आता जोर पकडला आहे. शुक्रवारी पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या आंदोलनाला अन्य राज्यातील डॉक्टरांचेही समर्थन मिळाले. त्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमधील आरोग्यसेवांवर त्याचा परिणाम झाला होता. याच हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील तब्बल 700 डॉक्टरांनी आपले राजीनामे दिला आहेत. सहकारी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतरही पश्चिम बंगाल सरकारकडून कोणत्याही कारवाईचे ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत तब्बल 700 सरकारी डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितल्यानंतरच आपण कामावर रूजू होणार असल्याची अट डॉक्टरांकडून घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एम्समधील डॉक्टरांच्या संघटनेनेही ममता बॅनर्जी यांना अल्टीमेटम दिले आहे. दोन दिवसांमध्ये डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास एम्समधील डॉक्टरही अनिश्चित कालावधीसाठी संपावर जातील, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून आले. तृणमूलचे नेते पार्थ चटर्जी आणि फिरहाद हाकिम यांनी डॉक्टरांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.