चालू घडामोडी – 10 एप्रिल

0
25

या लेखामध्ये आपण आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी थोडक्यात बघणार आहोत. या लेखाचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल.

राष्ट्रकुल खेळ 2018

भारताने आतापर्यंत एकूण 17 पदक (8 सुवर्ण, 4 रौप्य, 5 कांस्य) सह पदकतालिकेत तिसर्‍या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 91 पदकांसह (33 सुवर्ण) शीर्ष स्थानी आहे. दुसर्‍या स्थानी इंग्लंड 57 पदकांसह (21 सुवर्ण) आहे.

क्वेटोरीयल गिनीला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद इक्वेटोरीयल गिनी (विषवृत्तीय गिनी) या आफ्रिकेच्या राष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. तसेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे इक्वेटोरीयल गिनीला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती बनले आहेत.

आशियाई स्पर्धात्मकता अहवाल 2018

चीनच्या बोआओ एशिया मंचने (BFA) 8 एप्रिलला ‘आशियाई स्पर्धात्मकता अहवाल 2018’ प्रसिद्ध केला आहे. अहवालात आशियातल्या 37 अर्थव्यवस्थांच्या स्पर्धात्मकतेचे मूल्यांकन आणि विश्लेषण केले गेले आहे.

भारत-नेपाळमध्ये करार 

भारत-नेपाळमध्ये संरक्षण, व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. त्यात व्यापार, संरक्षण, रेल्वे, पाणी संबंधी सहा करारावर स्वाक्षरी झाली आहे.

लुईस थॉमस पारितोषिक २०१८ 

नोबेल विजेते वैज्ञानिक कीप थॉर्न यांना विज्ञान प्रसारासाठी केलेल्या कार्यासाठी लुईस थॉमस पारितोषिक २०१८ जाहीर करण्यात आले आहे.