चालू घडामोडी – 1 जानेवारी 2019

0
493

1 जानेवारी 2019 रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षेसाठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यंत आहे. दररोज फक्त 5 मिनिट द्या. चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालू घडामोडी ह्या विषयाचा अभ्यास होईल.

2022 सालापर्यंत IRSDCचे 50 विश्वस्तरीय रेल्वे स्टेशन पूर्ण होतील

भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाच्या (IRSDC) अंतर्गत बांधण्यात येणार्‍या 50 विश्वस्तरीय रेल्वे स्थानकांना 2022 सालापर्यंत पूर्ण केले जातील. 

450 कोटी रुपयांपर्यंत या प्रकल्पावर खर्च केले जाणार आहे. यामधून रेल्वे स्टेशनावर सर्व प्लॅटफॉर्मवर होल्डिंग क्षेत्रे, व्यवसायिक प्रतिष्ठाने, बस टर्मिनल, ऑफिस लॉबी, स्टेशनच्या बाहेर सेवा अपार्टमेंट, हॉटेल, हॉस्पिटल, स्पा आणि एक कन्व्हेन्शन सेंटर उभारले जातील. शिवाय हबीबगंज-निजामुद्दीन भोपाळ एक्सप्रेसला देशाची पहिली ISO सर्टिफाइड ट्रेन आहे.

 

जालंधर येथे 106वी ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ या कार्यक्रमाचे आयोजन

पंजाब राज्यात जालंधर या शहरात दि. 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत होणार्‍या ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC) 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. ही जगातली सर्वात मोठी विज्ञान परिषद आहे. ‘फ्यूचर इंडिया: सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर ही परिषद भरवली जाणार नाही. लवली प्रॉफेशनल विद्यापीठ (LPU) तर्फे या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

भारतीय रेल्वेची ‘मधमाशी योजना’ संपूर्ण आसाम राज्यात राबवविणार

भारतीय रेल्वे हत्तींना रेल ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी आसाम राज्यात ‘मधमाशी योजना’ (Honey Bee plan) राबवविणार आहे. रेल मार्गापासून दूर ठेवण्यासाठी मधमाशींचा रेकॉर्ड केलेला आवाज प्राण्यांना एकविला जातो. या योजनेमुळे रेल्वे ट्रॅकवर होणार्‍या प्राण्यांचा मृत्यू टाळण्यासाठी मदत होणार.