चालू घडामोडी – 09 जुलै, 2019

0
16

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
चला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात !!!
या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

200 मीटर रेसमध्ये हिमा दासने दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले :

6 जुलै, 2019 रोजी पोलंडमधील कुत्नो अॅथलेटिक्स मीटमध्ये भारताची धावपटू हिमा दास हिने 200 मीटरमध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. ह्या आठवड्यात तिचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. तिने पोलंडमध्ये झालेल्या महिलांच्या 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. हिमा दासला गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास होत असला तरी तिने 23.97 सेकंदात सुवर्णपदक जिंकले तर व्ही के विस्मयाने 24.06 च्या वेळेत रौप्यपदक जिंकले. 21.18 सेकंदाच्या वेळेत भारताच्या राष्ट्रीय रेकॉर्डधारक मोहम्मद अनास याने 200 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

भाजप सदस्यता अभियान – सपना चौधरी भाजपमध्ये सामील :

भाजपा सदस्यता अभियान 6 जुलै, 2019 रोजी नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आला आणि सपना चौधरी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाल्या. भाजप नेते मनोज तिवारी आणि शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. सपना चौधरी लोकप्रिय हरयाणवी नृत्यांगना आणि एक स्टेज कलाकार आहे, जिने बिग बॉस 11 मध्ये एक सामान्य स्पर्धक म्हणून भाग घेतला परंतु शो मधून परत आल्यावर ह्याची खूप चर्चा झाली होती. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या समारंभात सपना चौधरी सहभागी झाले होते. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ती म्हणाली, “दोनदा विचार करण्याची आवश्यकता नव्हती. मी त्यांच्या कार्यामुळे अत्यंत प्रभावित आहे. भाजप एक मोठा पक्ष आहे आणि मी त्याची सदस्यता घेतली आहे.” दिल्लीमध्ये भाजपचे सदस्यता अभियान 11 ऑगस्ट रोजी संपेल. यापूर्वी मार्च 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मोहिमेत काँग्रेसच्या नेत्यांनी ट्विटरवर घोषित केले होते की ती कॉंग्रेस पार्टीमध्ये सामील झाली आहे. परंतु, चौधरी यांनी स्पष्टपणे ते नाकारले होते.

कर्नाटक राजकीय संकट :

विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार 13 आमदारांच्या राजीनामावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतील. दुसरीकडे, सरकार पूर्णपणे संपुष्टात आणण्यापासून वाचविण्यासाठी जेडी (s)-कॉंग्रेस गठबंधनच्या 30 मंत्र्यांनी राजीनामा दिला. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकच्या राजकीय उथळ-गोंधळांमध्ये भाजपचीकोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले आहे. आता विधानसभा सभापती के.आर. रमेश कुमार सर्व आमदारांना बोलवून, त्यांच्याशी चर्चा करून आणि नंतर निर्णय घेवून प्रक्रिया सुरू करतील. ANI च्या ट्विटनुसार कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि के. सुरेश यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर लोकसभेत स्थगिती प्रस्ताव सादर केला आहे.

संरक्षण खात्यासाठीची तरतूद ८ टक्क्य़ांनी वाढली :

पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्रीपदाचा कारभार हाताळण्यापूर्वी राखलेल्या खात्याकरिता अधिक तरतूद करण्याचे पाऊल निर्मला सीतारमण यांनी उचलले आहे. संरक्षण खात्याकरिता यंदा 3.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा ती जवळपास 8 टक्क्य़ांनी वाढविण्यात आली आहे. यंदा करण्यात आलेल्या तरतुदीव्यतिरिक्त 1.12 लाख कोटी रुपये हे निवृत्तीवेतनाकरिता स्वतंत्र राखून ठेवण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन धरून संरक्षण खात्यासाठीची एकूण तरतूद चालू वर्षासाठी 4.31 लाख कोटी रुपये होत आहे. केंद्र सरकारच्या 2019-20 मधील एकूण भांडवली खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण 15.47 टक्क आहे. गेल्या वित्त वर्षांत संरक्षण खात्याकरिता 2.98 लाख कोटी रुपयांची तरतूद होती. वाढविण्यात आलेल्या रकमेपैकी 1.08 लाख कोटी रुपये हे नवीन शस्त्रखरेदी, सैन्य दलाकरिता उपकरण आदींसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. वेतन, देखभाल आदींसह एकूण महसुली खर्च 2.10 लाख कोटी अपेक्षित करण्यात आला आहे.

कर-विवादांच्या निवारणासाठी ‘अभय योजना’ :

सेवा कर आणि उत्पादन शुल्कासंबंधी प्रलंबित कर-विवादांशी निगडित 3.75 लाख कोटी रुपयांचा महसूल तंटामुक्त करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पाद्वारे ‘सबका विश्वास लीगसी डिस्प्युट रिझोल्यूशन स्कीम 2019’ नावाने अभय योजना प्रस्तावित केली. थकीत करासंबंधी स्वेच्छेने घोषणा करदात्यांकडून केली जाणे अपेक्षित असून, प्रत्येक प्रकरणागणिक थकीत कराच्या रकमेतून 40 टक्के ते 70 टक्के इतकी सवलत या अभय योजनेमार्फत दिली जाणार आहे. शिवाय थकीत रकमेवर व्याज आणि दंडात्मक शुल्कातून सवलत प्रस्तावित केली गेली आहे.