चंद्रयान-2 चे प्रक्षेपण तात्पुरते स्थगित करण्यात आले : नवीन प्रक्षेपण तारीख अद्याप जाहीर नाही

0
37

चंद्रयान-2 चे प्रक्षेपण निर्धारित वेळेच्या अवघ्या 56 मिनिटांपूर्वी स्थगित करण्यात आले. इस्रोने अजून नवीन प्रक्षेपण तारीखची अद्याप घोषणा नाही केली.

• भारताची दुसची चंद्रमा मोहीम ‘चंद्रयान-2’ निर्धारित वेळेच्या 56 मिनिटांपूर्वी स्थगित करण्यात आली. तांत्रिक अडचण आढळल्यावर इस्रोने ही एक प्रचंड सावधगिरीची घोषणा केली.
• यापूर्वीच्या अद्यतनांमध्ये इस्रोने घोषणा केली होती की रॉकेटच्या क्रायोजेनिक ऊपरी अवस्थेत द्रव हायड्रोजन देखील भरले होते.
• इस्रोने सोशल मिडियावर ट्विट करून ही घोषणा केली असून लवकरच नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले.
• भारताचे चंद्रयान-2 मिशन अति महत्वाचे आहे कारण चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवाजवळ जमिनीवर पाणी आणि बर्फ शोधण्यासाठी केलेले हे जगातील प्रथम मिशन आहे.

प्रक्षेपण स्थगितीचे प्रमुख कारणे :

• आपल्या वेबसाईटवर इस्रोने अद्ययावत केले की प्रक्षेपण होण्याच्या एक तासापूर्वी प्रक्षेपण वाहनाच्या यंत्रणेमध्ये तांत्रिक अडथळा आढळला. यामुळे सध्या सावधगिरीचे उपाय म्हणून चंद्रयान-2 प्रक्षेपण स्थगित करण्यात येत आहे. सुधारित प्रक्षेपण तारीख नंतर जाहीर केली जाईल.
• प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार रॉकेटच्या क्रायोजेनिक स्तरावर इस्रोला तांत्रिक गोंधळ सापडला आहे. क्रायोजेनिक रॉकेट स्टेज प्रत्येक किलोग्रॅम प्रजनकाला अधिक जोर देतो.
• नवीन प्रक्षेपण तारीख अद्याप जाहीर केली जाणार नाही कारण प्रक्षेपण विंडोला अनेक तांत्रिक निकषांची पूर्तता करावी लागते ज्यामुळे नवीन प्रक्षेपण तारखेसाठी काही आठवडे किंवा महिने लागू शकतात.
• या मोहिमच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक सेकंदाला निरीक्षण केले जात होते म्हणून एवढ्या मोठ्या मोहिमेत जोखीम घेण्यापेक्षा प्रक्षेपण स्थगित करणे योग्य असते.
• जुलै 2019 मध्ये चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठी अजून एकूण 3 योग्य विंडो कालखंड आहेत – 15 जुलै, 16 जुलै आणि 29 जुलै आणि 30 जुलै दरम्यान.
• प्रथम रॉकेटमध्ये भरलेले इंधन रिकामे केले जाईल, त्यानंतर रॉकेटला इतर तपासासाठी नेण्यात येईल.
• जीएसएलव्ही MK-III वर चंद्रावरचे गुपित रहस्य शोधण्याच्या उद्देशाने ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर वाहून नेण्यात येणार होते.
• जर भारताचे चंद्रमिशन सफळ ठरले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर एक अंतरिक्षयान उतरविणारा भारत चौथा देश ठरेल.
• भारताच्या चंद्रयान-1 मोहीम मुळे चंद्रावर पाणीचे अस्तित्व असल्याचा शोध लागला तर चंद्रयान-2 मोहीम या शोधावर अजून जास्त प्रकाश पाडण्याचा उद्देशाने केले जात आहे.
• चंद्रयान-2 मिशनसह एकत्रित केलेले सर्व उपकरणे, लँडर आणि रोव्हर, इस्रोला चंद्रमावर जास्त पाणी शोधण्यात मदत करेल.

पार्श्वभूमी :

• चंदयान-2, भारताचे चंद्रावरचे दुसरे मिशन 2008 मध्ये कॅबिनेटने मंजूर केले होते. हे स्वदेशी मिशनचे प्रक्षेपण प्रथम मार्च 2018 पर्यंत नियोजन करण्यात आले होते, परंतु लँडरच्या डिझाइनमध्ये बदल करण्यासाठी चार वेळा विलंब झाला होता.
• मोहिमेची 15 जुलै, 2019 ही प्रक्षेपण तारीख लँडरमध्ये डिझाइन बदल, कक्षातील बदल आणि नवीन जीएसएलव्ही मार्क तिसरा प्रक्षेपण वाहन हे सर्व बदल झाल्यावर ठरविण्यात आली होती.