चंदा कोचर यांचा आयसीआयसीआयचा राजीनामा

0
342

“आयसीआयसीआय’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप बक्षी यांची “आयसीआयसीआय’ने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे. बक्षी यांना 5 वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

चंदा कोचर यांच्याविरोधात “आयसीआयसीआय’ बॅंकेने चौकशी सुरू केली आहे. कोचर यांनी जरी राजीनामा दिला असला, तरी त्यांच्याविरोधातील ही चौकशी अशीच पुढे सुरू राहणार आहे. तसेच त्यांना मिळणारे लाभ या चौकशीतून काय निष्पन्न होते, यावर अवलंबून असणार आहेत, असे बॅंकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

चंदा कोचर यांनी स्वतःहून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव बॅंकेच्या संचालक मंडळापुढे ठेवण्यात आल्यावर संचालक मंडळाने त्यास मंजूरी दिली. व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी चंदा कोचर यांच्याविरोधात सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.