‘ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स’ वार्षिक अहवालात भारत 3ऱ्या स्थानी

0
11

दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. सलग दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.ज्या देशांच्या सरकारवर जनता सर्वाधिक विश्वास ठेवते अशा देशांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते.

# भारत या यादीत मागच्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत खाली आला आहे. मागच्या वर्षी भारत या यादीत पहिल्या स्थानावर होता. यावर्षी मात्र भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे.

# या रँकिंगमध्ये चीनने मोठी उडी घेतली आहे. तर अमेरिकेला सर्वात मोठं नुकसान झालं आहे. रँकिंगनुसार चीनचे 2017 मध्ये 67 पॉइंट्स होते.

# चीन मागच्या वर्षी तिसऱ्या स्थानावर होता. 2018 मध्ये  7 पॉइंट्सच्या वाढसह 74 पॉईंटने तो टॉपवर आहे.

# भारत मागच्या वर्षी 72 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर होता. या वर्षी 4 पॉइंट्स कमी झाले आहेत. जीएसटी आणि नोटबंदीनंतर लोकांमध्ये थोडीफार नाराजी होती.

# मोदी सरकारमध्ये मात्र हा उत्साह भरण्यासाठी काम करेल. सरकारशिवाय बिझनेस वर्ग, मीडिया आणि एनजीओ याकडे कशा प्रकारे बघते याबाबतीत ही भारत विश्वासपात्र गटात येतो. 4 पॉईंटसने भारत तिसऱ्या स्थानावर आहे.