‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्काराने सन्मानित होणार ‘सुपर ३०’ चे संस्थापक आनंद कुमार

0
192

शिक्षण क्षेत्रातील ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्काराने गणित तज्ज्ञ आणि सुपर ३० उपक्रमाचे संस्थापक आनंद कुमार यांना त्यांच्या क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी केल्यामुळे सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय उद्योग समूहातील एक अग्रगण्य कंपनी असलेली मालबार गोल्ड अॅण्ड डायमंड्स या कंपनीकडून येत्या त्यांना सन्मानित करण्यात आले .

मालबार ग्रुपचे सह अध्यक्ष पी. ए इब्राहीम हाजी यावेळेस बोलताना म्हणाले की आम्हाला आनंद कुमार यांना सन्मानित करण्यात अभिमान वाटतो आहे. अनेक लोकांच्या जीवनात त्यांच्या अर्थपुर्ण संकल्पनांमुळे सकारात्मक बदल झाला आहे. आपल्या जीवनात आंनद कुमार यांनी खरोखरच बरेच संघर्ष केले आहेत. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अग्रगण्य आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणा-या जगभरातील १०० जणांची यादी १२ सदस्य ज्युरीने ३ महिन्यांच्या संशोधनानंतर आणि विचाराअंती तयार केली आहे. आनंद कुमारांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ते सुपर ३० नावाने बिहारमध्ये हुशार असलेल्या परंतु गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम चालवतात. त्यांच्याकडून आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेऊन आयआयटीत प्रवेश मिळवला आहे.