गौरी लंकेश यांना मरणोत्तर अॅना पोलित्स्काया पुरस्कार जाहीर

0
12

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा अॅना पोलित्स्काया हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

गौरी लंकेश यांना मरणोत्तर अॅना पोलित्स्काया पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील महिन्यात ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. शोध पत्रकारितेमधील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. अॅना पोलित्स्काया या एक निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार मिळवणाऱ्या गौरी लंकेश या पहिल्याच भारतीय पत्रकार ठरल्या आहेत.

अ‍ॅना पोलित्स्काया या रशियन पत्रकार होत्या. रशियातील भ्रष्टाचार, गैरकारभाराचे त्यांनी पत्रकारितेद्वारे वाभाडे काढले होते. त्यांची वयाच्या ४८व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्कारासाठी प्रथमच भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे.