गोल्डन ग्लोब पुरस्कार 2018

0
485

76 व्या वार्षिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 2018 सालच्या चित्रपट आणि अमेरिकन दूरदर्शन कार्यक्रमांमधील सर्वोत्तमांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विजेत्यांची यादी –

सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाट्य) – बोहेमियन रॅप्सोडी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (संगीत किंवा विनोदी) – ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाट्य) – रॅमी मलेक (बोहेमियन रॅप्सोडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाट्य) – ग्लेन क्लोज (द वाइफ)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (संगीत किंवा विनोदी) – क्रिस्टीन बेल (वाइस)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संगीत किंवा विनोदी) – ओलिव्हीया कोलमन (द फेवराइट)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फोन्सो कुअरॉन (रोमा)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (अॅनिमेटेड) – स्पायडर-मॅन: इन्टू द स्पायडर-वेर्स

सर्वोत्तम चित्रपट (परदेशी भाषा) – रोमा

गोल्डन ग्लोब पुरस्कार 

अमेरिकेत दरवर्षी हॉलीवुड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) मनोरंजन जगतात उत्कृष्ट कामगिरींसाठी देशी-परदेशी कलाकारांना, चित्रपटांना गोल्डेन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करते. पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार जानेवारी 1944 ला दिला गेला.