गुरुत्वीय लहरीच्या संशोधनाला भौतिक शास्राचा नोबेल पुरस्कार

0
21

गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना पदार्थविज्ञानाचे नोबेल जाहीर करण्यात आले असून रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले.

गुरुत्वीय लहरींचा शोध लावून संशोधनासाठी विश्वाची कवाडे खुली करणाऱ्या अमेरिकेतील तीन खगोल भौतिकशास्रांना यंदाचा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांची नावे आहेत.

पदार्थविज्ञानाचे हे १११ वे नोबेल आहे, गुरुत्वाकर्षणाच्याही लहरी असतात, या आइनस्टाइनने वर्तवलेल्या शक्यतेवर गेल्या वर्षी शिक्कामोर्तब झाले. गेली अनेक वर्षे सर्व जगभरामध्ये गुरुत्वीय लहरींच्या शोधाच्या दिशेने प्रयत्न चालविले होते त्याला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत लायगो (लेसर इंटरफेरोमिटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी) प्रकल्पामध्ये यश मिळाले.

लायगोच्या ज्या उपकरणाद्वारे या लहरींचा शोध लावण्यात आला ती उपकरणे अमेरिकेमध्ये लिविंगस्टन, लुझियाना आणि हॅनफोर्ड, वॉशिंग्टन या ठिकाणी उभी करण्यात आली आहेत.१९८० साली विख्यात संशोधक रायनेर वाएस, रिचर्ड फेइन्मन, किप थॉर्न यांनी लायगोची कल्पना मांडली होती. या कल्पनेतून विकसीत झालेल्या एल आकाराच्या उपकरणाने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचे अस्तित्व शोधले. 

नोबेल पुरस्कार 

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.